पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवणार'

अजित पवार (ANI)

इंदु मिल येथे बांधण्यात येणारे डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढण्याचा निर्णय आज माहाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्यात येणार असून आता हा पुतळा ३५० फूटांचा असणार आहे. तर, चबुतऱ्याची उंची ही १०० फूट असणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले. 

राहुल गांधींनी रोज १५ तास पक्ष कार्यालयात काम करावे - संजय राऊत

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. आंबेडकरांचा पुतळा पूर्णपणे कांस्य धातूचा तयार करण्यात येणार आहे. एमएमआरडीए हे काम पाहणार आहे. दोन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, असे अजित पवारांनी सांगितले. 

'...म्हणून निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही'

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या ८ दिवसांत पूर्ण करणार आहे. तसंच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवण्यात येणार आहे. अतिशय देखणं, दिमाकदार, सर्वांना अभिमान वाटेल असं आंबेडकरांचे स्मारक उभं करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे असे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, २१ तारखेला शरद पवार इंदू मिलला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कलम ३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल - लष्करप्रमुख