पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत? अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

इंदोरीकर महाराज

मुला-मुलींच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संकटात सापडलेले इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात चांभार समाजाचा अवमान केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी आणि चर्मकार समाजाने मुंबईतील वर्तक नगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास करुन योग्य ती कारवाई करु असे पोलिसांनी तक्रारकर्त्यांना म्हटले आहे. 

...जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, थरुर यांचा टोला

इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात चर्मकार समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी चर्मकार समाजाचा अवमान केला आहे. त्यांनी सुतार समाजाबाबतही अशाच प्रकारचे वक्तव्य केल्याचे तक्रारकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पोलिसांनी तपास करणार असल्याचे म्हटले आहे. 

सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस

दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. इंदोरीकर महाराजांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

घरगुती गॅस सिलिंडर ५२ रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू