उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावरून कर्मचाऱ्यांना फसवून लुबाडणाऱ्या १९ वर्षीय तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी ऑनलाइन वस्तूंची ऑर्डर मागवली असल्याचं सांगून धीरज मोरे या तरूणानं मातोश्रीमधल्या कर्मचाऱ्यांकडून तीनदा पैसे उकळले.
रेल्वेने हमसफर एक्स्प्रेससाठी केलेले पाच बदल माहिती करून घ्या...
धीरज मोरे नावाच्या तरुणानं इथल्या कर्मचाऱ्यांना तीन वेळा फसवलं. धीरज डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. तो मुंबईतल्या परळ भागातला रहिवाशी आहे. मातोश्री बंगल्यावर पोलिसांचा कडक पाहारा असतो, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी पार्सल मागवल्याचं सांगून मोरेनं आत जाण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी मोरे यांनं जवळपास ८ हजार ५०० रुपये मातोश्रीवरच्या कर्मचाऱ्यांकडून उकळले होते. आदित्य ठाकरेंनी हेडफोन्स, पुस्तकं आणि कॉम्प्युटरचा माईक मागवल्याची वेगवेगळी कारणं देत त्यानं तीन वेळा पैसे उकळले. मात्र चौकशी अंतर्गत आदित्य यांनी कोणतंही पार्सल मागवलं नसल्याचं समोर आलं आहे.
आमची फाईल कायम डस्टबीनमध्येच जायची, उदयनराजेंची टीका
चौथ्यावेळी कर्मचाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे ऑनलाइन पार्सलबद्दल चौकशी केली. मात्र आपण कोणतंही पार्सल मागवलं नसल्याचं आदित्य यांनी सांगितलं. बिंग फुटलं हे लक्षात येताच मोरेनं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र बंगल्याबाहेर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.