पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देश 'मन की बात'वर नव्हे; 'जन की बात'वर चालतो: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  देश 'मन की बात' कडून आता 'जन की बात'च्या दिशेने जात असल्याचे दिल्लीकरांनी दाखवून दिले, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशवादी म्हणणाऱ्या भाजपला जनतेने धडा शिकवला, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

विजयानंतर केजरीवाल म्हणाले, दिल्लीवासियांनो 'आय लव यू!'

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्ष आणि अभिनंदन केले. एवढेच नाही तर भाजपला नाकारुन आपची साथ देणाऱ्या दिल्लीकरांचेही त्यांनी कौतुक केले आहे. दिल्ली विधानसभेसाठी ७० जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात मुख्य लढत झाली. 

'केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो'

प्रचारादरम्यान भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी संबोधले होते. यावर केजरीवालांनी संयमी प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते. जर मी दहशतवादी वाटत असेल तर कमळाचे बटन दाबा आणि कामे केली असतील तर झाडूसमोरील बटन दाबा, असे आवाहन केजरीवलांनी केले होते. निकालानंतर दिल्लीकरांनी भाजपला नाकारत पुन्हा केजरीवलांवर विश्वास ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 

'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

दिल्ली जिंकण्यासाठी भाजपने शक्तीप्रदर्शन करत प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह २०० खासदारांसह विविध राज्यातील ११ मुख्यमंत्र्यांनी भाजपचा प्रचार केला. पण भाजपला सत्ता परिवर्तन करण्यात यश आले नाही. भाजचा दिल्लीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi election result 2020 People have shown country will be run by Jan Ki Baat not Mann Ki Baat Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray