पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरणात इंद्राणी मुखर्जी माफीचा साक्षीदार, कोर्टाची मंजुरी

इंद्राणी मुखर्जी

शीना बोरा हत्यांकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची एक विनंती दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी मंजूर केली आहे. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तिची विनंती न्यायालयाने मंजूर केली. या प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम हे दोघेही आरोपी आहेत.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात आपण स्वखुशीने माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहोत, अशी विनंती तिने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. या प्रकरणातही इंद्राणी मुखर्जी आरोपी आहे.

'खूप कमी लोकांकडे असे धैर्य असते', प्रियांकांकडून राहुल गांधींचे कौतुक

न्यायालयाने या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीविरुद्ध दिल्लीतील न्यायालयात हजर होण्याचे वॉरंटही जारी केले आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी मुंबईतील तुरुंगात आहे.