पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव; सामनातून भाजपवर निशाणा

नरेंद्र मोदी आणि अमित शहा

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव झाला. केजरीवालांच्या झाडूने सगळ्यांना साफ केले, असे म्हणत शिवसेनेने 'सामना' मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने भाजपचा पराभव करत ६२ जागांवर विजय मिळवला. दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा आपला मिळालेल्या यशाबद्दल अरविंद केजरीवाल यांचे सर्व राजकीय पक्षांकडून कौतुक होत आहे. शिवसेनेने देखील सामनामधून दिल्लीत आपला मिळालेल्या यशावरुन अरविंद केजरीवालांवर कौतुकाचा वर्षाव करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

उमा भारतींकडून पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना

केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्ताव वैगरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या 'आप'चा झाला असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. 

Delhi Results: 'आप'ने गड राखला; भाजप एक अंकी तर काँग्रेसचा

दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणूक लढवाव्यात यावर भाजपमध्ये नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भाजपने प्रचार करत मतं मागितली. पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकरुन लावले व केजरीवालांनी ५ वर्षात केलेल्या कामावर मतदान केले, असे सामनात म्हटले आहे. 

Delhi Election Results: ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त

दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार आणि शक्तिमान भाजपला भारी पडले. केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील २५० खासदार, २००-४०० आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्याचे मंत्री आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले. पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि 'हम करे सो कायदा' या वृत्तीचा हा पराभव असल्याची टीका करण्यात आली.

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडूनही केजरीवालांना शुभेच्छा!

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही दिल्लची निवडणूक गृहमंत्री अमित शहांनी प्रतिष्ठेची केली होती. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना अमित शहांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही. झारखंडमध्ये पराभव झाला आणि ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महात्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर आपचा झेंडा फडकला तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा असल्याचे सामनात म्हटले आहे. 

शिवसेनेचं सावरकरांवरील प्रेम कायम आहे का बघू!- मुनगंटीवार