पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: अजित पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहिती देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील शेतक-यांना तातडीने मदत करुन दिलासा देण्यात यावा अशी मागणी यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासाठी निवेदन दिले.

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, 'परतीच्या पवासाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज आणि वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. तसंच, द्राक्ष बागांसह इतर फळबागांचे आणि भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाखांची मदत द्यावी. पशुधन आणि घरांची पडझड झाली आहे त्याचे देखील तात्काळ पंचनामे करावे, रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतं मोफत द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

PMC बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये आणखी वाढ

दरम्यान, राज्यामध्ये सरकार कधी स्थापन होणार हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे राज्यपालांनी स्वत: हस्तक्षेप करुन यंत्रणेला कामाला लावावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी विनंती केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, शेतकऱ्यांना सरकारकडून करण्यात येणारी १० कोटींची मदत ही तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करुन सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.  

आमदार फुटण्याची भीती नाही, बाळासाहेब थोरात यांना खात्री

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delegation of congress and ncp leaders arrives at raj bhavan to meet maharashtra governor