पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंगरी इमारत दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरुच

डोंगरी इमारत दुर्घटना

मुंबईतील डोंगरी भागामध्ये मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. या परिसरामध्ये असणारी चार मजली केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जे जे रुग्णालय आणि हबीब रुग्णालयाच उपचार सुरु आहेत.  बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. ही इमारत १०० वर्षे जुनी असून यामध्ये १५ कुटुंब राहत होती. ढिगाऱ्याखाली जवळपास ४० लोकं अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य सुरु आहे.

डोंगरीत इमारतीचा काही भाग कोसळला; ४० ते ५० जण अडकले

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरबाई इमारत कोसळली त्यावेळी मोठा आवाज झाला. भूकंप झाल्यासारखा मोठा आवाज आल्याने आसपासच्या लोकांनी इमारतीकडे धावे घेतली. ११ वाजून ४० मिनिटाने ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी, एनडीआरएफची टीम आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तिंना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळपासून सुरु असलेले बचाबकार्य अद्यापही सुरु आहे. 

डोंगरी दुर्घटना : अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यास मोठा अडथळा

ढिगाऱ्याखालून चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढले

ज्या परिसरामध्ये ही घटना घडली त्या भागातील रस्ते अरुंद असल्याने बचावकार्यामध्ये अडथळा येत होता. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करुन बचावकार्यामध्ये मदत केली. दरम्यान, घटनास्थळावर एमआयएमचे आमदार वारिस पठाण, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरिष महाजन, मिलिंद देवरा यांनी भेट दिली. तसंच, मुंबईचे पोलस आयुक्त संजय बर्वे आणि झोन १ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसंच मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

डोंगरी इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - वारिस पठाण

डोंगरी दुर्घटना : मानवी साखळीद्वारे मदतकार्य सुरू

दरम्यान, केसरबाई इमारत १०० वर्षे जुनी आहे. या इमारतीचा समावेश धोकादायक इमारतीच्या यादीत नव्हता. इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला काम दिले होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, मुंबई महानगर पालिकेने केसरबाई इमारतीला ७ ऑगस्ट २०१७ रोजी नोटीस पाठवली होती. या इमारतीला 'सी १' म्हणून वर्गीकृत केले होते. लवकरात लवकर ही इमारत पाडण्यात यावी असे देखील या नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. तसंच कोणतिही दुर्घटना झाल्यास आम्ही जबाबदार नाही असं देखील या नोटीसमध्ये लिहिले होते. तरी देखिल या धोकादायक इमारतीमध्ये नागरिक राहत होते. 

'इमारत 100 वर्ष जुनी असताना धोकादायक इमारत यादीत समावेश नाही'

धोकादायक इमारतीची नोटीस पाठवली होती; पालिकेचा दावा

डोंगरी इमारत दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या नागरिकांसाठी मुंबई महानगर पालिकेने इमामवाडा महापालिकेची शाळा आश्रयासाठी खुली करुन दिली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांवर जे जे रुग्णालय आणि हबीब रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या इमारत दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. 

Dongri Building Collapses : १० जणांचा मृत्यू, ८ जखमी