पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी लपून-छपून काही करत नाही - अजित पवार

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार

मी लपून-छपून काही करत नाही. तिकडेही उघडपणे गेलो आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले आणि इकडेही उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो, असे दिलखुलासपणे अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. त्यांच्या उत्तरानंतर सभागृहातील सदस्यांमध्ये हशा पिकला.

कोरोनामुळे १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय

ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आठवड्यात काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. हा मुद्दा पकडून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीच त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्याची आठवण करून दिली. त्यावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.

कोरोनामुळे देशापुढे मोठे संकट, पण सरकार गुंगीतच; राहुल गांधींची टीका

ते म्हणाले, मी कधी लपून-छपून काही करत नाही. जे काही असेल ते उघडपणे करतो. त्यावेळी तुमच्याकडे उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर इकडेही उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. ज्योतिरादित्य शिंदेसारखे महाराष्ट्रात काहीही होणार नाही. तुम्ही तुमच्या पक्षाकडेच लक्ष द्या. काही जण सभागृहात दिसत नाहीत. त्यांच्याकडे बघा, अशा स्वरुपाचे उत्तर अजित पवार यांनी दिले.