पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक; खंडणीविरोधी पथकाची कारवाई

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ही कारवाई केली आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला खंडणीच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली आहे. रिजवान देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. 

'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, रिजवान हा दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. इकबाल कासकर हा आधीच तुरुंगात आहे. बुधवारी रात्री रिजवान देश सोडून जाण्याच्या तयारी होता. त्याचवेळी पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन त्याला अटक केली. 

बिल गेट्स यांची श्रीमंतांच्या यादीत घसरण, दुसऱ्या 

दरम्यान, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याविरोधात तपास करत असताना मुंबई पोलिसांनी छोटा शकीलचा सहकारी अफरोज वडारिया उर्फ अहमद रजा याला अटक केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते. त्यावरुनच त्याला अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी दाऊदचा पुतण्या रिजवान कासकर याला पोलिसांनी अटक केली. 

कर्नाटकमधील एका आमदाराचा राजीनामा मागे, आता पुढे काय...