पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फास्टॅगच्या माध्यमातून कोट्यवधींची चोरी, चौघांना अटक

सायबर गुन्हेगारी

फास्टॅगच्या साह्याने आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबईतील सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील चौघांना पोलिसांनी रविवारी बंगळुरूमधून अटक केली. बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून या चोरट्यांनी २० कोटी रुपये आपल्या खात्यांमध्ये वळविले, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. एका खासगी बँकेच्या फास्टॅगसाठीच्या ई-वॅलेटमधील त्रुटींचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी या त्रुटींचा सुमारे ४००० बेकायदा आर्थिक व्यवहारांसाठी वापर केला आणि हे पैसे आपल्याकडे वळते केले. पोलिसांनी ज्या खात्यांमध्ये हे पैसे वळते केले. त्यापैकी काही खाती सील करून सात कोटी रुपये वसुल केले आहेत.

कोरोनामुळे भारतातील हिरे व्यापारास ८ ते १० हजार कोटींचा फटका

टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर देशातील सुमारे २४ बँकांनी त्यांच्या ई-वॅलेटच्या माध्यमातून कारमालकांना फास्टॅग उपलब्ध करून दिले. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

पुरुषोत्तम रेवाण्णा, किरण मंजू, राजेश शिवाण्णा आणि प्रकाश शिवाण्णा अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. २५ जानेवारीला या प्रकरणी एका खासगी बँकेने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 

'सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करू शकते'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बँकेच्या ई-वॅलेटमधील त्रुटींचा या चोरट्यांनी अभ्यास केला होता. ज्यांनी या बँकेचे फास्टॅग घेतले आहे. त्यांच्या माहितीचा वापर करून ते या ई-वॅलेटमध्ये लॉग इन करत. त्यानंतर या ई-वॅलेटमधील त्रुटींचा वापर करून वेगवेगळ्या फास्टॅगमधील पैसे आपल्या वेगवेगळ्या बँक खात्यात वळते करीत असत. १८ ते २४ जानेवारी या काळात त्यांनी अशा पद्धतीने सुमारे २० कोटी रुपये आपल्या खात्यांमध्ये वळते केले.