पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर यायला सुरूवात

छत्रपती शिवाजी महाराज स्थानक

गेल्या काही तासांपासून पावसामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  ते कुर्ला अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तर तब्बल अडीच तासानंतर कुर्ल्याहून कल्याणला पहिली लोकल रवाना झाली आहे.

दुपारपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यानं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पावसानं उसंत घेतल्यानंतर आता ट्रॅकवरचंही पाणी ओसरू लागलं आहे. मध्य रेल्वेच्या स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. 

हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी वडाळ्याहून वाशीपर्यंत विशेष बससेवा


 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जलद मार्गावरील वाहतूकही सुरू झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. पहाटेपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानकात पाणी साचलं होतं त्यामुळे  ठाण्यापासून कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला फटका बसला होता. शनिवार दुपारनंतर मात्र धीम्या गतीनं सुरू असलेली मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे कोलमडली. 

जलद गतीवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे सेवा सुरू असली तरी अत्यंत धीम्यागतीनं ही सेवा सुरू आहे त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडला आहे.