पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंबानींच्या घराबाहेर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टीलीया निवासस्थानी तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. देवदन रामभाई बकोत्रा असं या सीआरपीएफ जवानाचं नाव आहे. ते मुळचे गुजरातचे आहेत. सोबत बाळगलेल्या अद्ययावत रायफलमधून अपघाताने सुटलेली गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. 

नालासोपारा : बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा अटकेत

पेडर रोड येथील ‘अ‍ॅन्टीलीया’ या अंबानी यांच्या निवासस्थानी देवदन तैनात होते. त्याच्याजवळ असलेली  अद्ययावत रायफल खांद्यावरून बाजूला करताना खाली पडली आणि त्यातून दोन गोळ्या सुटल्या . संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.  त्यानंतर तातडीनं सीआरपीएफ जवानांनी देवदन यांना जसलोक रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारांदरम्यान मध्यरात्र त्यांचा मृत्यू झाला.  या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सरकारच्या जाहिरातींमध्ये PM मोदींचे छायाचित्र ठेवा: देवेंद्र फडणवीस