पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तानाजी सावंत यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडले खेकडे

तानाजी सावंत यांच्या घराबाहेर सोडले खेकडे

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे फुटल्याचे अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या निवासस्थानाबाहेर खेकडे सोडून त्यांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नंतर हे सर्व खेकडे पोलिस ठाण्यात नेले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या खेकड्यांनी मंत्रिमहोदयांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला, असे या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले.

रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी आठवडाभरात समिती

तिवरे धरण फुटल्यामुळे २० लोकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना तानाजी सावंत यांनी या धरणाच्या भिंतीजवळ खूप खेकडे होते. त्यांनी भोकं पाडल्यामुळे धरणाच्या भिंतीला भगदाड पडले, असे अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचे ते म्हणाले. स्थानिकांनी आमच्या अधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून दिले होते. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उपाययोजनाही केल्या होत्या. पण त्यानंतरही धरण फुटण्याची घटना घडली. हे दुर्दैवी आहे, असे तानाजी सावंत म्हणाले.

तिवरे धरण फुटल्यानंतर तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड गेल्या आठवड्यात खेकडे घेऊन नौपाडा पोलिस ठाण्यात गेले होते. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य केले होते.