पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाग्रस्तांना शोधण्यासाठी मध्य रेल्वेचा विशेष उपक्रम, २०० जणांना प्रशिक्षण

प्रातिनिधिक छायाचित्र

लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे. दरदिवशी लाखो लोक रेल्वेनं प्रवास करत असतात. सध्या  कोरोना विषाणूमुळे मध्ये  रेल्वेनंही विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेनं आपल्या २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाशी लढण्याकरता विशेष प्रशिक्षण दिलं आहे, जे प्रवाशांमधील कोरोनाची लक्षणं ओळखून त्यांना मदत पुरवणार आहेत तसेच त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्याकरता मदतही करणार आहेत.  

कोरोना: खबरदारीसाठी व्हिसासंदर्भात भारत सरकारचा मोठा निर्णय

स्टेशन मास्टर, टी.सी., तिकीट बुकिंग अधिकारी, रेल्वे रुग्णालयातील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जर  या विषाणूची लक्षणं आढळली तर अशा प्रवाशांना मदत पुरवणं, त्यांची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि अशा रुग्णांना मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात उपचारांसाठी पाठवणे  ही जबाबदारी या कर्मचाऱ्यांची असणार आहे. 

 लोकलच्या डब्ब्यात कोरोनाची प्रमुख लक्षणं असलेला एखादा प्रवासी आढळला तर सहप्रवासी देखील त्याची माहिती रेल्वेला देऊ शकतात. यासाठी ११२३९७८०४६ आणि १८२  हा  हेल्पलाइन क्रमांकही रेल्वेकडून पुरवण्यात आला आहे.  अशा प्रवाशांना रेल्वेच्या आपातकालीन वैद्यकीय रुम्समध्ये नेण्यात येईल. तिथून त्यांना  कस्तूरबा रुग्णालयात पाठवण्यात येईल. 

नागपूरमध्येही एकाला कोरोनाची लागण, राज्यातील रुग्णांचा आकडा ११ वर

रेल्वेनं प्रत्येक डब्ब्यात  काही सूचनापत्रकही लावले आहेत. दरदिवशी  मध्य रेल्वेनं लाखो  प्रवासी प्रवास करतात त्यामुळे प्रत्येक प्रवाशांचं स्कॅनिंग करणं शक्य नाही. गर्दीच्या वेळी यामुळे इथे मोठी कोंडी होऊ शकते, त्यामुळे अशा प्रकारची प्राथमिक खबरदारी रेल्वेकडून घेण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.