पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

मध्य रेल्वे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त  मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या दिवशी अनुयायांना आणि मुंबईकरांना कोणत्याही गैरसोयीला समोर जावं लागू नये यासाठी मध्य रेल्वेकडून  विशेष लोकल्स आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सोय करण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

'शबरीमला प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही'

मध्य रेल्वेकडून लांब पल्ल्यांच्या १४ विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या नागपूर, अजनी, सोलापूर, गुलबर्गा आणि इतर ठिकाणांहून धावणार आहेत. तर याव्यतिरिक्त मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी १२ विशेष लोकल्सचीही सोय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेनं महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगांव स्थानकावर अनारक्षित विशेष गाड्यांना १ मिनिटांचा थांबा दिला आहे. 

अर्थव्यवस्थेवर सरकारची भूमिका दिशाहीन: चिदंबरम