पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वेवर लवकरच स्वतःचे बॉम्ब शोधक पथक तैनात

मध्य रेल्वे

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी आता खास मध्य रेल्वेसाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पथकासाठी एक गाडीही देण्यात आली आहे.

अयोध्या प्रकरण : युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबरची अंतिम मुदत

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २० सप्टेंबरपासून तैनात असणार आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या गाडीमध्ये बॉम्ब शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे असणार आहेत. रेल्वे पोलिसांच्या १२ कर्मचाऱ्यांकडे या गाडीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी या पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासाठी लागणारी उपकरणे या वर्षी जानेवारीमध्ये खरेदी करण्यात आली. त्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये ही उपकरणे जोडून तयार करण्यात आली. उपकरणे खरेदी करण्यास वेळ गेल्यामुळेच हे पथक सज्ज होण्यास उशीर झाला आहे. 

'... म्हणून ब्राह्मण समाजाने भाजपविरोधात मतदान करावे'

सध्या कोणत्याही रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू आढळल्यावर रेल्वे पोलिसांकडून मुंबईतील राज्य सरकारच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले जाते. यामुळे संबंधित ठिकाणी पोहोचून संशयास्पद वस्तूची पाहणी करणे आणि पुढील कार्यवाही करणे यास वेळ जातो. यामुळे मुंबईत रेल्वे स्थानकांवर उपनगरीय गाड्यांसाठी मोठी गर्दी उसळते. आता त्यामध्ये बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.