पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी वडाळ्याहून वाशीपर्यंत विशेष बससेवा

हार्बर रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुसळधार पावसामुळे हार्बर आणि मध्य  रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर रेल्वेची सीएसएमटी ते वाशी आणि मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे वाहतूक ठप्प आहे.  त्यामुळे  प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी वडाळ्यांहून वाशीपर्यंत १२ विशेष  बसेसची सोय करण्यात आली आहे. कुर्ला स्थानकात पाणी साचल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

हार्बर, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेनेही प्रवाशांसाठी दादर ते सीएसएमटी विशेष  लोकल्सची सोय केली आहे. दादर स्थानकातून  सीएसएमटीकडे जाणाऱ्या विशेष लोकल्स जलद मार्गावरून धावणार आहेत. त्याचप्रमाणे अडकलेल्या प्रवाशांची कुर्ला, दादर आणि  सीएसएमटी स्थानकानजीकच्या पालिकेच्या  शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी मनोहरदास शाळेत, दादर स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची गोखले महापालिका शाळेत आणि कुर्ला स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची पाटणकर शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणासाठी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांना जन्म घ्यावा लागलाः जानकर

त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी चहा, अल्पोपहार आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.