पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड १९ BMC अन् आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांचा ताळेबंद जुळेना!

कोरोना विषाणू

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा थांबण्याची चिन्हे दिसत नाही. गुरुवारी धारावीत कोरोनाने तिसरा बळी घेतला. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील कल्याणवाडी येथील एका ७० वर्षीय महिलेने कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. परेळच्या केईएम रुग्णालयात या महिलेने अखेरचा श्वास घेतला. 

तबलिगींच्या मुद्यावरुन राज्याच्या गृहमंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

बृहमुंबई महानगर पालिकेने या महिलेचा मृत्यू हा कोरोनाची लागण झाल्यामुळेच झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धारावीमध्ये आतापर्यंत १४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  बृहमुंबई महानगर पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत ७७५ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. हा आकडा आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकड्यापेक्षाही अधिक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत आतापर्यंत ७४६ कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

१.७ कोटी पीपीई किटची ऑर्डर दिली, व्हेंटिलेटर, N-95 मास्कचा पुरवठा सुरु

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाच हजारहून अधिक असून राज्यात बाराशेहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेऊनही कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रण मिळवण्यात अपयश येतानाचे चित्र आहे.