पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार

मंत्रालय

निर्जंतुकीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असल्याने बुधवार २९ आणि गुरुवार ३० दोन दिवस मंत्रालयातील मुख्य आणि विस्तारित इमारत तसेच नवीन प्रशासन भवन पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती कोविड नियंत्रण कक्षाने दिली आहे.  कोरोना साथीत सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये याठिकाणी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. ही फवारणी होणार असल्याने मंत्रालयातील सर्व विभागांची कार्यालये बंद राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

धार्मिक रंग न देता कारवाई करावी, बुलंदशहरप्रकरणी CM ठाकरेंची प्रतिक्रिया

चीनच्या वुहानमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे देशातही वेगाने संक्रमण होताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनाचे कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकार तसेच भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्याकडून देण्यात येणाऱ्या निदेशानुसार राज्य सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहे. 

यूपीमध्ये दोन साधूंची हत्या करणाऱ्याला अटक, हत्येचे कारण उघड

कोरोना विषाणूवर सध्याच्या घडीला कोणतीही लस उपलब्ध नाही. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून आपण या विषाणूवर मात करणे हाच सध्याच्या घडीला आपल्यासमोर एकमेव पर्याय आहे. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करुन प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी पाळावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशव्याी लॉकडाऊनसारखे कठोर निर्णयही घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आर्थिक संकट घोंगावण्याची चिन्हे हळूहळू गडद होताना दिसते. याचाच अर्थ सध्या साथिच्या रोगावर मात करताना आर्थिक परिस्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान केंद्र आणि राज्य सरकारसमोर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid 19 The maharashtra state ministry office will be completely closed for two days for disinfection