पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुणाचं काय तर कुणाचं काय, ऋषी कपूर म्हणतात, मद्य विक्रीला परवानगी द्या!

ऋषी कपूर

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर एका ट्विटमुळे वादात सापडले आहेत. कोरोनाच्या संकटाला थोपवण्यासाठी आर्थिक संकटाची परवा न करता केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गर्दी टाळून वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

कोरोनाशी लढा: टाटा ट्रस्टकडून तब्बल ५०० कोटींची मदत

नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे प्रकाशझोतात येणाऱ्या ऋषी कपूर यांनी लॉकडाऊनच्या काळात सायंकाळच्या वेळेस परवाने असणारी मद्य विक्रीची दुकाने खुली करण्याची सरकारने परवानगी द्यावी, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे. दुकाने खुली केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल, असा अजब दावाही त्यांनी आपल्या ट्विटमधून केलाय. ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लागोपाठ ट्विट केली आहेत. देशातील चिंतातूर परिस्थितीत मद्याची दुकाने खुली करण्याच्या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. देशावर संकट घोंगावत असताना ऋषी कपूर यांनी व्यक्त केलेली भावना संतापजनक आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.

कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत

ऋषी कपूर यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढ नका. सरकारने सायंकाळच्या वेळेस मद्य विक्रीला परवानगी द्यायला हवी. घरात बसलेला प्रत्येक माणूस सद्य परिस्थितीमुळे तणावात आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना थोडासा दिलासा हवा आहे. त्यांनी लागोपाठ केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ब्लॅकने मद्य विक्री सुरु असल्याचा दावाही केलाय. एवढेच नाही मद्यविक्रीतून कर स्वरुपात मिळणाऱ्या पैशांची राज्य सरकारला सध्या गरज आहे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:COVID 19 Lockdown Rishi Kapoor Requests The Government To Open All Licensed Liquor Stores In The Evening During Lockdown