पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CM ठाकरेंच्या १६० जणांच्या सुरक्षा ताफ्यावर क्वॉरंटाइनची वेळ!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकर (संग्रहित फोटो)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६० कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या सर्वांना  वांद्रे (पूर्व) येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून कोविड-१९ तपासणीसाठी या सर्वांचे सँम्पल घेण्यात आले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील 'मातोश्री' निवासस्थानाजवळ असलेल्या चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याच्यावर जोगेश्वरी येथील हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात  उपचार सुरु आहेत.

'कोरोनाचा एक रुग्ण ३० दिवसांत ४०६ जणांना करु शकतो बाधित'

चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यात एकूण १६० कर्मचारी आहेत. सुरक्षा कर्मचारी चहा विक्रेत्याच्या संपर्कात आल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूः जपानमध्ये आणीबाणी जाहीर