पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खंडणी प्रकरणात रिजवान कासकरची रवानगी पोलीस कोठडीत

रिजवान कासकरची रवानगी पोलीस कोठडीत

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिजवान कासकर आणि अहमद रजासह आणखी दोन जणांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज या सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. खंडणीच्या आरोपावरुन रिजवान कासरकला १७ जुलैला पोलिसांनी अटक केली. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री उशीला त्याला अटक केली होती.

 

वांद्र्यातील एमटीएनएल इमारतीला भीषण आग; १०० जण अडकले

रिजवान कासकर हा दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. इकबाल कासकर हा आधीच तुरुंगात आहे. १७ जुलैला रात्री रिजवान देश सोडून जाण्याच्या तयारी होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी मुंबई एअरपोर्टवर धाव घेतली आणि त्याठिकाणावरुन रिजवानला अटक केली.

Chandrayaan-2 : असा असेल 'चांद्रयान २' चा पुढील प्रवास
 
दरम्यान, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याविरोधात तपास करत असताना मुंबई पोलिसांनी छोटा शकीलचा सहकारी अफरोज वडारिया उर्फ अहमद रजा याला अटक केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते. त्यावरुनच त्याला अटक करण्यात आली होती. वडारियाच्या चौकशी दरम्यान रिजवान कासकरचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रिजवानला अटक केली. 

चांद्रयान-२ मुळे संपूर्ण देशाचा गौरव - पंतप्रधान