पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पनवेलजवळ दुचाकीवरून पूल ओलांडताना एक दाम्पत्य वाहून गेले

प्रातिनिधिक छायाचित्र

पनवेलजवळ गाढी नदीवरील पूल ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक दाम्पत्य नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. माथेरान रस्त्यावर पनवेलपासून १५ किलोमीटर अंतरावर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उमरोली गावाजवळ ही घटना घडली. 

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दाम्पत्याचे नाव आदित्य आम्रे (वय ३०) आणि सारिका आम्रे (वय २८) असे आहे. हे दाम्पत्य पूल ओलांडत असताना त्यावरून पाणी वाहात होते. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर आला आहे. त्यातच हा पूल जास्त उंच नाही. त्याला कठडेही नाहीत. या सगळ्यात त्यावरून पाणी वाहात असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने हे दाम्पत्य वाहून गेल्याचे सांगितले जाते.

'महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त भाजप खासदारांची पदयात्रा'

पूलावरून दाम्पत्य आणि त्यांची दुचाकी वाहून गेल्याचे पोलिसांनीही सांगितले आहे. त्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्याचबरोबर अग्निशामक दलाचे जवानही कार्यरत आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्रे दाम्पत्य हे मूळचे या ठिकाणी राहणारे नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांना या भागाची पूर्ण माहिती नाही.