पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कंपनी करात कपातीचा निर्णय साहसी, महाराष्ट्राला याचा फायदाच - मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करात कपात करण्याचा घेतलेला निर्णय साहसी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. त्याचबरोबर या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढणार असून, राज्याला याचा फायदाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात गोव्यामध्ये अर्थमंत्र्यांनी कंपनी करात (कॉर्पोरेट टॅक्स) कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आर्थिक मंदीच्या स्थितीवर मात करण्यासाठी काय उपाय योजत आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन या दोघांचे आभारही मानले.

बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सक्रीय - लष्करप्रमुख

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंपनी करात कपात करण्याचा निर्णय अत्यंत साहसी आहे. यामुळे आपल्याला व्यापार युद्धात फायदाच होणार आहे. गुंतवणूक वाढण्यालाही यामुळे मदत होईल. गेल्या काही महिन्यांमध्ये अर्थव्यवस्थेला स्लो डाऊनमधून बाहेर काढण्यासाठी विविध निर्णय सरकारने घेतले आहेत. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. पण आतापर्यंत याचा थेट फायदा लगेचच कर्जदार ग्राहकांना मिळत नव्हता. पण आता रेपो रेट कमी केल्याचा फायदा लगेचच ग्राहकांना मिळणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

नारायण राणेंचा भाजप प्रवेश युतीच्या वाटाघाटींवर अवलंबून - सूत्र

युती संदर्भात लवकरच निर्णय
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती आणि जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय होईल. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना भाजपमध्ये घेण्यासंदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:corporate tax slashed it is bold decision by central government says chief minister devendra fadnavis