पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ७ वर; दोन नव्या रुग्णात भर

कोरोना

मुंबईतील सर्वात मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ७ वर पोहचला आहे. दोन्ही नव्या रुग्णांचे वय ८० आणि ४९ वर्ष असून ते धारावीतील डॉ. बलीगा नगर येथे राहतात. हे दोघेही कोरोनाची लागण झालेल्या ३० वर्षीय महिलेच्या संपर्कात आले होते. 

भारताचे मोठे पाऊल, हायड्रोक्सिक्लोरिक्विनवरील निर्यात बंदी हटवली

धारावीमध्ये याआधी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामधील ५६ वर्षीय व्यक्तीचा सायन रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. धारावीतील डॉ. बलीगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर आणि मदीना नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. या भागामध्ये पालिकेकडून सतत औषध फवारणी केली जात आहे. 

चीन आला धावून, भारताला मदत म्हणून दिले पीपीई किट्स

दरम्यान, मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे.  एकट्या मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. तर ४३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, देशभरात कोरोनामुळे ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४,४२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 

कोरोना क्वारंटाईन वॉर्डसजवळ पशू-पक्षी येऊ देऊ नका, अन्यथा...