पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी टाटांकडून हॉटेलवर राहण्याची सोय

रतन टाटा

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत आहे. त्यांच्यासाठी टाटा समूहाने मदतीसाठी हात पुढे केला आहे. टाटा समूहाने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या पंचातारांकित हॉटेलची दारं उघडली आहेत. या हॉटेल्सवर त्यांच्या राहण्याची आणि विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. 

कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला: राज ठाकरे

टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसी) मुंबईतील आपल्या ५ पंचतारांकीत हॉटेल्समध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाचे कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस, वांद्र्यातील हॉटेल ताज लँड, सांताक्रुझ येथील हॉटेल ताज, द प्रेसिडेंट आणि अंधेरीतील हॉटेल जिंजरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या आवाहनाला नितीन राऊत यांचा आक्षेप

त्याचसोबत टाटा समूहाने गोव्यातल्या मडगाव येथील आणि नोएडा येथील हॉटेल जिंजर येथे देखील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, टाटा समूह डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंचतारांकीत हॉटेलमधील खोल्या विनामुल्य देणार आहेत. दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईसाठी याआधी टाटा समूहाने १५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा