पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू

कोरोना विषाणूमुळे मुंबईत एका वृद्ध नागरिकाचा मंगळवारी मृत्यू झाला. (प्रातिनिधिक छायाचित्र)

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा ६५ वर्षांचा होता. या संदर्भातील माहितीला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे. या रुग्णाला आधीपासून उच्च रक्तदाब आणि इतरही काही आजार होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. 

कोरोना : ...म्हणून पुढील १५ ते २० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

कस्तुरबा रुग्णालयातील इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेला हा देशातील तिसरा रुग्ण आहे. या आधी कर्नाटकमधील एका आणि दिल्लीतील एका रुग्णाचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला होता. 

३ वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा, रुग्णांमध्ये प्रथमच बालकाची नोंद

मंगळवारी मुंबईत मृत पावलेली वृद्ध व्यक्ती दुबईहून आली होती. तिथून आल्यावर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.