पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन

राज्यात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे.

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

तुमचे ऐकतो, पण तुम्हीही आमचे ऐका; चिदंबरम यांचा पंतप्रधानांना टोमणा

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील ३५ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरला कोरोना झाल्याचे समजताच डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. तसंच, धारावीतील ज्या बिल्डिंगमध्ये डॉक्टर राहतो ती मुंबई महानगरपालिकेने सील केली आहे. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही' 

दरम्यान, याआधी धारावीमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सायन रुग्णालयात उपचारा दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर या मृत रुग्णाच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले. तसंच तो ज्या परिसरात राहत होता तो परिसर सील करण्यात आला. तर गुरुवारी धारावीमध्ये कार्यरत असलेल्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या सफाई कर्मचाऱ्यासोबत काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोविड १९ रुग्णांना मलेरियारोधक औषधे दिल्यास ह्रदयाला धोका, नवे संशोधन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus one more covid 19 case confirmed in dharavi 35 year old doctor has tested positive