पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे.

मुंबईमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचमध्ये तैनात असलेल्या ३४ वर्षीय सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर भायखळा पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

देशात कोरोनाबाधितांचा ११ हजार ९३३ वर, ३९२ रुग्णांचा मृत्यू

दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी पॉझिटव्ह आल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत भायखळ्याच्या पोलिस वसाहतीमध्ये कोरोनाबाधित पोलिस अधिकारी ज्या इमारतीमध्ये राहतात ती सील करण्यात आली आहे. वसाहतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी केली जात आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

पुण्यात आणखी ६ जणांनी गमावला जीव, राज्यातील मृतांचा आकडा १८७ वर

तसंच, कोरोनाबाधित पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती झोन ४ चे पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दिली. तसंच पोलिस वसाहतीतील त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

कोविड-१९ : राज्यातील ७० टक्के कोरोनाग्रस्त २१ ते ५० वर्षे वयोगटातील