पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून किराणा घेण्यास नकार देणाऱ्याला अटक

किराणा दुकान

कोरोना विषाणूच्या संकटा दरम्यान एका डिलिव्हरी बॉयकडून तो मुस्लिम असल्यामुळे किराणा घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी किराणा घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. मीरा रोडच्या जया पार्क येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत पुढचे पाऊल, इंग्लंडमध्ये मानवी चाचणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयने किरोना घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन घनश्याम चतुर्वेदी (५१ वर्ष) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. डिलिव्हरी बॉय मंगळवारी सकाळी किराणा देण्यासाठी चतुर्वेदी यांच्या घरी पोहचला. त्यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयला त्याचे नाव विचारले. डिलिव्हरी बॉयचे नाव कळाल्यानंतर चतुर्वेदीने आम्ही मुसलमानांच्या हातातून किराणा घेणार नाही, असे सांगितले. 

पुण्यात ९२ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

दरम्यान, डिलिव्हरी बॉयने ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. त्यानंतर त्याने थेट पोलिस ठाण्यात जात चतुर्वेदींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चतुर्वेदींविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी चतुर्वेदींना घरातून अटक करण्यात आली. ठाण्यातील सेशन कोर्टात त्यांना हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. 

मुंबईत कोरोना रुग्णांवर प्लाज्मा पद्धतीने उपचारस ICMR ची मान्यता