पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID 19: वर्षभराचा पगार सरकारला देणार, जितेंद्र आव्हाडांचा निर्णय

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाविरोधातील लढाईसाठी उद्योजक, सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण शक्य होईत तेवढी मदत करत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने लोकप्रतिनिधींच्या वेतनामध्ये ६० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. अशातच 'माझा फक्त एका महिन्याचा नाही तर वर्षभराचा पगार सरकारी तिजोरीत जमा करा.', अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. यावेळी राज्यशासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. मला यावर्षीचा संपूर्ण पगार देऊ नये, तो सरकारी तिजोरीत जमा करावा. गोरगरिबांच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी तो वापरावा. तसंच, माझ्या वाहन चालक आणि पीए यांचेही वेतन सरकारी तिजोरीत जमा करावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

लॉकडाऊनः व्होडाफोनकडून ग्राहकांना फ्री टॉकटाइम

दरम्यान, राज्यात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे. सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. अशातच कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात केली आहे. त्यांच्या महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. 

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त, १८ वर्षांच्या नीचांकावर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus housing minister jitendra awhad says take my annual salary for fight against covide 19