पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १ कोटींचे मास्क जप्त

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धाड टाकून सुमारे एक कोटी किंमतीचे ४ लाख मास्क जप्त केले (छायाचित्

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धाड टाकून सुमारे एक कोटी किंमतीचे ४ लाख मास्क जप्त केले आहेत. मुंबई विमानतळाच्या मालवाहतूक टर्मिनलजवळील एका गोदामात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात सध्या कोरोना विषाणूची साथ असल्यामुळे मास्कला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या मास्कचा काळाबाजार करण्याच्या हेतूने अवैधरित्या साठा करण्यात आला होता. पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. 

इराणवरुन आले २७७ भारतीय; जोधपूरला विलगीकरण कक्षात ठेवले

मंगळवारीही वांद्रे येथे सुमारे १५ ते २० कोटी रुपये किंमतीचे २५ लाख मास्क जप्त केले होते. गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या ९ क्रमांकाच्या यूनीटने ही कारवाई केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः गोदामाला भेट देऊन पोलिसांना सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

कॅबिनेट बैठकीत दिसली 'सोशल डिस्टन्सिंग'ची झलक, पाहा व्हिडिओ

सध्या राज्यात काहीजण मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार करत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाकडून अशांवर कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडी येथे वापरलेल्या मास्कचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. तर अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.