पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आशादायी ! राज्यातील ३४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत

आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने रविवारी द्विशतक ओलांडले. राज्यात कोरोनाबाधितांमध्ये १७ रुग्णांची भर पडली. ही संख्या २०३ वर गेली. यात मुंबई ३, नागपूर २, पुणे १, बुलढाणा १ आणि अहमदनगर ३ असे नवे रुग्ण आढळून आले. 

कोरोनाची लागण झालेले सुरुवातीचे रुग्ण ठणठणीत झाल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने सध्याची वेळ महत्त्वाची असून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका अशी विनंती केली आहे. 

विद्यार्थ्यांचे 'वर्क फ्रॉम होम'; पक्षांसाठी घरटी, पाण्याची केली सोय

दरम्यान, राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा हा १९६ वर गेला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात १०७ रुग्ण, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद १, यवतमाळ ३, मिरज २५, सातारा २, सिंधुदूर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १ आणि बुलढाणा १ अशी रुग्णांची संख्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी सांगितले. मिरजमधील २५ रुग्ण हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील असल्याचे सांगण्यात येते. 

बॅकस्टेज काम करणाऱ्यांसाठी मराठी कलाकारांचा मदतीचा हात