पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पुढचे १५ दिवस कसोटीचे, कृपा करुन शिस्त पाळा'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

'कोरोना विषाणूने महत्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. हा विषाणू दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात गुणाकार करायला लागतो. त्यामुळे पुढचे १५ दिवस खूप कसोटीचे आहे. नागरिकांनी कृपा करुन शिस्त पाळावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माणूस जगवायचा असेल तर आपल्याला माणुसकी जपली पाहिजे, असे सांगितले.

कोरोना कहर: गेल्या २४ तासांत ७५ नवे रुग्ण, तर चौघांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'वारंवार सांगूनही अजूनही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही. वस्तू खरेदीसाठी गर्दी करु नका. धक्कादायक म्हणजे लोकं दुधाच्या टँकरने प्रवास करत आहेत. हे अतिशय भयानक आहे. तुम्ही जिथे आहेत तिथेच थांबा. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. परराज्यातील कामगारांची जबाबदारी सरकार घेत आहे.' तसंच, 'इतर राज्यात अडकलेल्या कामगारांची माहिती येत आहे. त्यांची सुद्धा त्याठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे.', असे त्यांनी सांगितले.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ५१ लाखांची मदत करणाऱ्या साई संस्थानाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. अनेक संस्थान मदतीसाठी पुढे येत आहेत ही सध्याची गरज आहे. तसंच, कोरोनाचे रुग्ण जरी वाढत असले तरी दिलासादायक बाब म्हणजे अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनासंबंधित कोणतिही लक्षणं आढळली आणि ताबडतोब खबरदारी घेतली तर तो लवकर बरा होता, असे देखील त्यांनी सांगितले.

तसंच, खासगी डॉक्टरांनी कृपा करुन दवाखाना बंद करु नका. अशा लक्षणांची रुग्ण येत असतील त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसंच, पोलिसांशी हुज्जत घालू नका त्यांना मदत करा. ते फक्त आपल्या हितासाठी काम करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासोबत, राज्यभर शिवभोजन केंद्रांची क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. शिवभोजन चालकांनी शिस्त पाळा आणि जेवायला आलेल्यांनी सुद्धा अंतर ठेवून बसा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली

दरम्यान, सध्या भितीचे वातावरण आहे. सरकारने खबरदारी घेतली आहे. फक्त तुम्ही दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा. पुढचे १५ दिवस कसोटीचे आहेत. ही परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला कोणीही थोपवू शकत नाही. फक्त काही काळ घरात राहणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, आपल्यावर ही लादली गेलेली परिस्थिती आहे. या परिस्थितीचा सामना स्वयंशिस्तीने आणि जिद्दीने करायचा आहे, असे देखील त्यांनी सांगितले.