मुंबईतल्या चेंबूरमधील कोरोनाबाधित बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बाळाच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाळावर आणि आईवर सध्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची पुन्हा दोन वेळा कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर बाळाच्या वडिलांना सुद्धा विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
.. तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान
चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात २६ मार्च रोजी महिलेने बाळाला जन्म दिला. या महिलेला आणि बाळाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर महिलेला आणि बाळाला कस्तुरबा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु करुन दोघांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात आली. गुरुवारी रात्री आलेला त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे बाळाच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला.
रामायण, महाभारतासह डिस्कवरी ऑफ इंडियाही दाखवा, काँग्रेसची मागणी
खासगी रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदार कारभारामुळे आईला आणि बाळाला कोरोनाची लागण झाली, असल्याचा आरोप बाळाच्या वडिलांनी केला होता. तसंच, रुग्णालयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्ये निर्जंतुकीकरण न करता बाळासह आईला ठेवण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चेंबरमधील खासगी रुग्णालय गुरुवारी सील करण्यात आले.
कोविड १९ : शाब्बास! क्रिकेटपटूनं उचलली ३५० कुटुंबियांची जबाबदारी