पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच दिवसांत धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पटीनं वाढ

धारावी

गेल्या पाच दिवसांत धारावीत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या  रुग्णांच्या संख्येत तिप्पटीनं वाढ झाली आहे. ११ एप्रिलपर्यंत धारावीत कोरोनाचे २८ रुग्ण समोर आले तर १६ एप्रिलपर्यंत हा आकडा ८६ वर पोहोचला. तर मृतांचा आकडाही या कालावधीत ४ वरुन ९ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी एकाच दिवशी धारावीत कोरोना विषाणूची बाधा झालेले २६ नवे रुग्ण समोर आले आहेत. लक्ष्मी चाळीत राहणाऱ्या ५८ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. 

तबलीगी जमातच्या लोकांना आश्रय देणाऱ्या ११ जणांना कोरोना

गुरुवारी समोर आलेल्या २६ नव्या रुग्णांपैकी ११ रुग्ण हे मुस्लिम नगरमधले तर प्रत्येकी एक हे जनता सोसायटी, सुर्योदय सोसायटी, शिव शक्ती नगरमधले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे धारावीपरिसरातील आहेत. पहिल्यांदा १ एप्रिलला धारावीत पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. धारावीत जे हाय रिस्क लोक आहेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.  तर लो रिस्क लोकांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. धारावी ही  मुंबईची अत्यंत दाटीवाटीची वस्ती आहे, या भागात  कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून  प्रशासन खबरदारीचा उपाय करत आहेत. 

मुंबईत २ हजारहून अधिक रुग्ण, समूह संसर्गाचा धोका नसल्याने मोठा दिलासा