पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत २ हजारहून अधिक रुग्ण, समूह संसर्गाचा धोका नसल्याने मोठा दिलासा

कोरोना विषाणू

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तीन हजारांचा टप्पा पार केला असून एकट्या मुंबईतील रुग्णांचा आकडा हा दोन हजारहून अधिक झाला आहे. मुंबईत मागील २४ तासांत १०७ नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी बुधवारी राज्य आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात २३२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते. या तूलनेत आजचा आकडा नियंत्रणात असणे ही राज्य सरकार आणि प्रशासनाला दिलासा देणारी आहे. 

२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईतील आकडा हा थक्क करणारा आहे. कोरोना विषाणूचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात तपासणी केली जात आहे. जवळपास ५०  हजारहून अधिक नमुने म्हणून घेण्यात आले आहे. एका बाजूला कोरोनाग्रस्तांचा राज्यातील आकडा वाढताना दिसत असला तरी यातून पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांचे  प्रमाणही वाढताना दिसत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी  सुमारे २९५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्या सरकारकडून देण्यात आली आहे. 

आनंदाची बातमी: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

मुंबईतील आकडा हा आश्चर्यकारकरित्या वाढला असला तरी शहरावर समूह संसर्गाचे संकट ओढावलेलं नाही, असे मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे. फिव्हर क्लिनिकमधील प्राथमिक तपासणीच्या अहवालावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुंबईतील नागरिक सरकारच्या नियमाचे पालन करत आहेत. आणखी काही दिवस नियम पाळून आपण वाढता आकडा नियंत्रणात आणू शकतो, असे विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.