पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

धारावी

मुंबईतील दाट लोकवस्ती आणि मोठी लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. याठिकाणी दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात धारावीमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी काम करणाऱ्या एका पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. 

दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई महानगरपालिकेच्या जी -उत्तर विभागात करनिर्धारण आणि संकलन खात्यात निरीक्षक पदावर हा अधिकारी काम करत होता.  या पालिका अधिकाऱ्यावर धारावीमध्ये अन्न वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हे काम करत असताना अचानक त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 

कोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून तो रोखण्यासाठी पालिकेकडून आणि राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत धारावीत ३४४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा