पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर गेल्यामुळे भावाची हत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक जण घराबाहेर पडत आहेत. अशातच लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडला त्यामुळे मुंबईत एका तरुणाने त्याच्या लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

व्हेंटिलेटरची किंमत १० लाख रुपये, महिंद्रा बनवणार साडेसात हजारांत

कांदिवली पूर्वच्या गावदेवी भागामध्ये ही घटना घडली आहे. दुर्गेश लक्ष्मी ठाकूर (२१ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्गेशचा मोठा भाऊ राजेश (२८ वर्ष) त्याला लॉकडाऊन आहे घराबाहेर जाऊ नको असे वारंवार सांगत होता. तरी सुद्धा दुर्गेश घराबाहेर गेला. यावरुन दुर्गेश आणि त्याच्या भावामध्ये वाद झाला. या वादा दरम्यान संतप्त झालेल्या राजेशने लोखंडी तवा दुर्गेशच्या डोक्यात घातला.

मोठा निर्णय: राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहणार

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुर्गेशला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी राजेशला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. दुर्गेश पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. लॉकडाऊनमुळे कंपनीला सुट्टी मिळाल्यामुळे तो मुंबईत घरी आला होता.