पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या 'त्या' प्रवाशांना कोरोनाची बाधा नाही - आरोग्य मंत्री

प्रातिनिधिक छायाचित्र

दुबईहून परतलेल्या आणि पुण्यातील जोडप्याच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांच्या आरोग्य चाचणीचा अहवाल आला आहे. या प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. स्थानिक माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे पुण्यातील काही शाळा रविवारपर्यंत बंद

गेल्याच आठवड्यात दुबईहून परतलेल्या पुण्यातील दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य तीन जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचे एकूण पाच रुग्ण असून त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे जोडपं एका खासगी टूर कंपनीसोबत सहलीसाठी गेलं होतं. या जोडप्याच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील सहा नागरिकांना तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आरोग्य चाचणीचा अहवाल बुधवारी समोर आला.

... आणि शरद पवारांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक

या रुग्णांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती  आरोग्यमंत्र्यांनी दिली. मात्र, त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील दाम्पत्यासोबत सहलीसाठी गेलेल्यामध्ये यवतमाळ, मुंबई, ठाणे अशा ठिकाणच्या अनेक व्यक्तींचा समावेश होता. प्रवासादरम्यान या जोपडप्याच्या संपर्कात आलेल्या ४० प्रवाशांचाही शोध लागला असून त्यांना आरोग्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच त्यांची तपासणीही होणार आहे अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.