पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर, ७ रुग्णांचा मृत्यू

धारावी

मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. धारावीत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाचे आणखी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर पोहचला आहे. तर मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला आहे, मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे. 

देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत  कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत चालली आहे. धारावीतील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी डॉक्टरांचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करत आहे. तसंच कोरोनाचे रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून याठिकाणी नजर ठेवण्यात येत आहे.

सरकारने गरिबांना वाऱ्यावर सोडले, चिदंबरम यांची टीका

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २४५५ वर पोहचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

रेल्वे, हवाई वाहतूक ३ मे पर्यंत बंद राहणार
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus 6 more covid 19 positives cases and 2 deaths related to virus reported in dharavi