पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबई: आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे मागील २४ तासांत ४६२ जणांचा मृत्यू झाला. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात जास्त आहे. अशात नवी मुंबईतील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार

नवी मुंबईतल्या महापे एमआयडीतीली आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या ४० कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यामधील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे बुधवारी समोर आले. एका खासगी लॅबमध्ये त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी वाशी येथील एनएमएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महापे येथील या आयटी कंपनीमध्ये बँकेच्या डेटाबेसचे काम केले जाते.  

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ डीलवर आनंद महिंद्रांचे टि्वट

नवी मुंबई महानगरापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले की, कोरोनाबाधित १९ कर्मचाऱ्यांपैकी ७ जण नवी मुंबईमध्ये राहणारे आहेत. २ जण ठाणे, ७ जण मुंबईमध्ये राहणारे आहेत. तर सांगली, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचा प्रत्येकी एक जण आहे. या कंपनीला सध्या सील करण्यात आले आहे. तसंच कंपनीच्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. तसंच, या कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा काही इतिहास आहे का नाही याचा तपास घेतला जात आहे. तसंच या कंपनीत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

लोकसभेपाठोपाठ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील कर्मचाऱ्याला कोरोना