पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू: मुंबईत आढळले दोन संशयित रूग्ण

कस्तुरबा रुग्णालय

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. चीनवरुन भारतात आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरुन त्यांना   वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई महानगर पालिकेच्या एका आरोग्य अधिकाऱ्यांने शुक्रवारी सांगितले की, 'महानगर पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोरोनो विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी एका स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था केली आहे.'

NZvsIND : राहुल-विराटनं पाया रचला अन् श्रेयसने विजयाचा कळस चढवला!

पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी सांगितले की, 'अशा लोकांची स्वतंत्र वार्डमध्ये तपासणी केली जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. निरिक्षणाखाली ठेवलेल्या व्यक्तींबद्दल पुढील तपशिलाची प्रतीक्षा केली जात आहे.' त्यांनी पुढे असे सांगितले की, 'मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनवरुन आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यांच्यामध्ये कोरोनो विषाणूची काही लक्षणे आढळल्यास त्यांना या स्वतंत्र वॉर्डमध्ये पाठविण्यास सांगितले आहे.'

फोन टॅप प्रकरण : इस्रायला जाऊन चौकशी केली तरी हरकत नाही

मुंबईतील सर्व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना एखाद्या रुग्णामध्ये अशाप्रकराचा विषाणू आढळल्यास तातडीने बीएमसीला कळवण्यास सांगितले आहे. कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात दिशानिर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूमुळे  सर्दीपासून ते श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, श्वसनास त्रास यासारखी लक्षणे आढळतात.

राज ठाकरेंना मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास का?

दरम्यान, चीनच्या काही प्रांतात कोरोनो विषाणूनच्या संसर्गामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८३० नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. चीनमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाल्यामुळे एकूण पाच प्रांतात अधिक खबरदारी घेतली जाते आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंधने घालण्यात आली आहेत. अनेक नागरिक विषाणूच्या भीतीमुळे घरातून बाहेर पडण्यास तयार नसल्याचे दिसते आहे. 

'...कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'