पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लागोपाठ घडलेल्या त्या दोन घटनांमुळे राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेस साशंक

सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मुंबईत बैठकींना सुरुवात झाली असली, तरी काँग्रेस पक्षाला अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेतूंबद्दल शंका आहे. या आठवड्यात लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे या शंकांना आणखीनच बळ मिळाले आहे. 

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सोमवारी नवी दिल्लीत झाली. या बैठकीनंतर पक्षाकडून आपला निर्णय शिवसेनेला कळविला जाणार होता. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन केला. या फोन कॉलमध्ये त्यांनी सोनिया गांधी यांना तूर्त आपला निर्णय स्थगित ठेवण्यास सांगितले. सरकार कशा पद्धतीने बनवायचे याबद्दल मला शिवसेना नेत्यांशी बोलायचे आहे. त्यामुळे तूर्त आपला निर्णय जाहीर करू नये, असे त्यांनी सोनिया गांधी यांना कळवले. त्यामुळे काँग्रेसने त्या दिवशी कोणताही निर्णय जाहीर केला नाही.

दुसरी घटना मंगळवारी घडली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत वेळ दिला होता. पण त्याच दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजभवनाला ई-मेल पाठविण्यात आला. ज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आला. त्याच दिवशी दुपारी राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी मंगळवारी दुपारीच ब्राझीलला रवाना होणार होते. त्यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलाविण्यात आली आणि या बैठकीत राष्ट्रपती राजवटीला मंजुरीही देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसला जर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत वेळ दिला होता. तर मग राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळी साडेअकरा वाजताच राज्यपालांकडे आणखी वेळ देण्याची मागणी का केली, इतकी गडबड करायचे कारण काय होते, असा प्रश्न आता काँग्रेसला पडला आहे. यामागे नक्कीच काहीतरी गूढ घडामोडी घडल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटते.

उद्धव ठाकरेंकडून आमदारांना मतदार संघात जाण्याचे आदेश

काँग्रेसच्या दिल्ली आणि मुंबईतील काही नेत्यांना असे वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही हे सरकार अस्तित्त्वात येण्यासंदर्भात साशंक आहे. त्याचवेळी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून शिवसेनेकडून अधिकाधिक पदे पदरात पाडून घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. 

शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारशी दोन हात करून राज्यात सत्ता स्थापन करायची का, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजून विचार करतो आहे. महाराष्ट्रासारखे मोठे राज्य गमवावे लागल्यास भाजप नक्कीच आनंदी असणार नाही, याकडेही काँग्रेसच्या नेत्याने लक्ष वेधले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress unsure of NCPs intentions amid talks with Shiv Sena on govt formation in Maharashtra