पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काळजीवाहू सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही: बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

राज्यात काळजीवाहू सरकार आहे मात्र या सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन शेतक-यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करत निवेदन दिले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. 

'युतीला बहुमत असल्याने भाजप-सेनेनेच सत्ता स्थापन करावी'

या सरकारने आतापर्यंत जनतेला खोटी आश्वासनं दिली आहे. खोटी आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीच करत नाही. संकटाच्या काळात सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज असल्याचे थोरात यांनी सांगितले. राज्यात महापूर बाधित लोकांसाठी सरकारने ६८०० कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. पण ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण ती कधी मिळणार? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे. 

सत्ता संघर्षाच्या कसरतीमध्ये मुख्यमंत्री सरसंघचालकांच्या

दरम्यान, निवडणुकीचे निकाल लागून बरेच दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा द्यायला कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अनेक भागात पंचनामे सुरुही झालेले नाहीत. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी थोरातांनी केली आहे. तसंच राज्यावर आलेल्या या संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान