पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार'

बाळासाहेब थोरात

राज्यातील सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला होता. याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. 'तीन अंकी नाटकाचा शेवट नेमका काय होतो हे पाहिले पाहिजे. तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार', असल्याचे प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. 

 

क्रिकेट खेळत नाही पण त्याचे नियोजन करतो, शरद पवारांचे उत्तर

भाजप काय बोलते याला महत्व नाही. भाजप २२० जागांच्या गप्पा मारत होते. मात्र तसं झालं नाही. बोलणं आणि वस्तुस्थितीचा फरक भाजपणे जाणून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री पद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील. राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, असे त्यांनी सांगितले. 

'मोदी, शहांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, गडकरी आमचे मित्र आहेत. पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो पण इथे बॉल दिसत नाही. ते भाजपला कळाले असेल, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना भेटायला खूप उशीर केला. आम्ही आधीच राज्यपालांना भेटून मदत करावीची मागणी केली होती असे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: नवाब मलिक