पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यपाल भाजपचे बाहुले आहेत का?: सचिन सावंत

सचिन सावंत

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी कमी वेळ दिला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करत राज्यपालांच्या भूमीकेवर आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे भाजपचेच बाहुले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल.' अशी खोचक टीका सचिन सावंत यांनी केली आहे. 

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव, कपिल सिब्बल मांडणार बाजू

विधानसभा निवडणूक होऊन २० दिवस झाले तरी देखील राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. जर राष्ट्रवादीला देखील सत्ता स्थापन करण्यास अपयश आले तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.

ये सब खेल हो रहा है, ओवेसींचा आघाडी-शिवसेनेला टोला