पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसची अवस्था बर्मुडासारखी, रावसाहेब दानवेंची टीका

रावसाहेब दानवे

काँग्रेसची अवस्था बर्मुडासारखी झाली आहे, त्यामुळे त्यांना राज्यात ५-५ कार्याध्यक्षांची नेमणूक करावी लागत आहे, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निशाणा साधला. भाजप हा परिवार तर काँग्रेस ही परिवाराची पार्टी आहे, असा टोला ही त्यांनी लगावला.

भाजप कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक आहे. त्याप्रसंगी दानवे बोलत होते. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद गेल्याने नाराज नसल्याचे स्पष्ट केले आणि नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 

काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना भाजपत घ्या, दानवेंचा सल्ला

दानवे पुढे म्हणाले की, आज काँग्रेसची काय अवस्था झाली आहे पाहा. कोणी अध्यक्ष व्हायला तयार नाही. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी त्यांना महाराष्ट्रात ५-५ कार्याध्यक्ष नेमावी लागली आहेत. त्यांची अवस्था बर्मुडासारखी झाली आहे. 

माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा आज केंद्रीय मंत्री झाला आहे. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, काँग्रेसमध्ये नाही. कर्नाटक आणि गोव्यातील यांचे आमदार पक्ष सोडत आहेत. यांचे आमदार फुटले आणि ते दोष भाजपला देत आहेत.

गतवेळी जिंकलेली एकही जागा भाजप सोडणार नाहीः दानवे

अमित शहांनी सांगितले आहे की, विरोधी पक्षात जे चांगले आहेत. त्यांना पक्षात घ्या, त्यांना आपल्यासारखे करा, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी झटण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे पंतप्रधान असल्याचेही म्हटले.