पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र लढवून दाखवावेच, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

चंद्रकांत पाटील

वंचित आघाडीचा फायदा भाजपला झाल्याचे सांगितले जाते. पण भाजपचा विजय हा वंचित आघाडी किंवा ईव्हीएममुळे नव्हे तर मजबूत बुथरचना आणि विकासकामांमुळे झाला आहे, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या कार्यकारिणीच्या मुंबईतील बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला स्वतंत्र निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास त्यांना अवघ्या १०-१० जागाच मिळतील, असे भाकित त्यांनी केले.

काँग्रेसची अवस्था बर्मुडासारखी, रावसाहेब दानवेंची टीका

ते पुढे म्हणाले की, मागील ५ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड विकासकामे केली आहेत. ५ वर्षांत १५ हजार कोटी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली, पंढरपूर वारीसाठी निधी देऊन पालखी मुक्कामानंतर होणारी अस्वच्छता बंद झाली आहे. रेल्वे स्थानकावरील अस्वच्छताही आता बंद झाली आहे. हे काँग्रेसला इतक्या वर्षांत कधी जमले नाही. ते भाजपने सत्तेत येताच केले. या विकासकामांमुळेच भाजपला निवडणुकीत यश मिळाले आहे.

शिवसेनेबरोबरील युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, २०१४ साली काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली. ते जर एकत्र लढले असते तर कदाचित आपली सत्ता येऊ शकली नसती. आपण दोन भावंडं आहोत. संपत्तीवरुन कुटुंबात वाद होत असतातच. समविचारी पक्ष एकत्र यायलाच हवेत. त्यामुळे आपण युती केली आहे. युती होणार असली तरी आपण २८८ जागांसाठी तयारी करणार आहोत.

सत्तेत समान वाटा, याचाच अर्थ मुख्यमंत्रिपदही विभागूनचः आदित्य ठाकरे

काँग्रेस-राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे आव्हान त्यांनी दिले. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर दोघांना फक्त १०-१० जागाच मिळतील. २० आमदारांवर ते काहीच राजकारण करु शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress ncp should fight forthcoming assembly election separately challenge by bjp president chandrakant patil